संस्थेबद्दल माहिती

डॉ. ज्ञानेश्वर यशवंत सकपाळ फाउंडेशन – रजि. नंबर ई /१२६६७ / ठाणे (महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त संस्था) शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक विभागात गेली अनेक वर्षे काम करत आहे. संस्थेचे संस्थापक तथा अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर यशवंत सकपाळ हे एक प्रसिध्द मनोविकास तज्ञ आहेत, ते गेली अनेक वर्षे समुपदेशन क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत आहेत. संस्थेच्या उपाध्यक्ष सौ. सोनाली ज्ञानेश्वर सकपाळ आहेत. संस्थेच्या मार्फत आत्ता पर्यंत अनेक समाज उपयोगी मोफत शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे, यामध्ये योग शिबीर, आरोग्य शिबीर, भगवत गीता आणि दैनंदिन जीवन शिबिर, व्यसनमुक्ती शिबीर, व्यक्तिमत्व विकास शिबीर, संगीतोपचार शिबीर, संमोहन शास्त्र शिबीर, आयुर्वेद आणि आरोग्य शिबीर, प्राणायाम, ध्यान शिबीर, अभिनय शिबीर, पुष्प औषोधी उपचार शिबिर, आदि. समाज उपयोगी वेगवेगळ्या शिबिरांचे आयोजन आता पर्यंत केले आहे व दर महिन्याला वेगेवेगळ्या तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या विषयांच्या शिबिरांचे आयोजन केले जाते. सदर शिबिरे संपूर्णपणे मोफत असल्याने त्याचा फायदा अनेक नागरिकांना होत आहे व भविष्यात ही होत राहील. प्रत्येक जनमाणसाचा मानसिक व शारीरिक विकास व्हावा यासाठी संस्था सतत कार्यरत असते.

संस्थेची उद्दिष्टे

सुशिक्षित बेरोजगार लोकांना रोजगार देणे.
तालुका, जिल्हा, शहरी भागात सक्षम समुपदेशक घडवणे.
समुपदेशनच्या माध्यमातून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवणे.
व्यवसाय करण्यासाठी मराठी बांधवाना सहकार्य व प्रोत्साहन देणे.

संलग्न / Association With

गॅलरी

संपर्क

पत्ता :

तळमजला, न्यु फोरम बिल्डींग, जय हिंद कॉलनी, गुप्ते रोड,
डोंबिवली पश्चिम: ४२१२०२, महाराष्ट्र.

संपर्क

९६९९३६७२९९
९३२१०१४१९०

ईमेल

drdysfoundation22@gmail.com

Address

Ground Floor, New Foram Building, Near Durga Panwala, Jai Hind Colony, Gupte Road, Dombivli West.

Call Us

(+91) 9699367299
(+91) 9321014190

Mail Id

drdysfoundation22@gmail.com

Scroll to Top